विद्यार्थी समुपदेशन कार्यशाळा

। पनवेल । वार्ताहर ।

भारत विकास परिषद, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल व ठकेकर क्लास यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी (दि.28) करण्यात आले होते. या कार्यशाळेत 110 विद्यार्थांनी हजेरी लावली होती. तर, अंदाजे 50 पालक, 40 भाविप, रोटरी व ठकेकर क्लासचे कार्यकर्ते सदस्य असे एकूण 200 सदस्य कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात आभा जांबेकर व मैत्रेयी कुलकर्णी यांच्या सुस्वर संपूर्ण वंदेमातरम् गीत गायनाने झाली. दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या व्यासपीठावरील आगमनानंतर भाविप अध्यक्षा डॉ. किर्ती समुद्र यांचे प्रास्ताविक, रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे अध्यक्ष श्रीयुत रतनजी खरोल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे डॉ. गिरीश गुणे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. शिल्पा परहर यांनी विद्यार्थी दशेतील ताणतणाव व व्यवस्थापन, मनिष गोडबोले यांनी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया व येणार्‍या अडचणी, तर अनिल ठकेकर यांनी आजचा विद्यार्थी व आव्हाने या विषयावर विद्यार्थांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला भारत विकास परिषद पश्‍चिम क्षेत्राचे जॉईंट सेक्रेटरी महेश शर्मा उपस्थिती लाभली.

Exit mobile version