पेझारी येथे विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर

। पेझारी । वार्ताहर ।
आदर्श शाळा पेझारी व रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोअर यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरराष्ट्रीय योगा दिन व विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जि.प.सभापती चित्रा पाटील, डॉ. राजेंद्र चांदोरकर रोटरी क्लब अध्यक्ष मनिष परब, डॉ.राजेश्री चांदोरकर, डॉ.अक्षय कोळी, सिम्पल मॅडम, डॉ.निलेश म्हात्रे, माधुरी म्हात्रे, प्रतीक पाटील गौरी चव्हाण, गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळ आदी उपस्थित होते.

शाळा विकास समितीचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे, आरती थळे नितीश पाटील आदींनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक नितीश पाटील यांनी केले. यावेळी चित्रा पाटील यांनीही मार्गदर्शन केले.डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी दरवर्षी पेझारी शाळेतील अभ्यासाबरोबर सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी होणार्‍या दोन विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात यावी व त्यासाठी प्रोत्साहन म्हणून 10 हजारांचा निधी मुख्याध्यापक नितिश पाटील सर यांच्याकडे सुपूर्द केला अशाच प्रकारे पुढील तीन वर्ष 10,000 रुपये शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिले जातील असे त्यांनी जाहीर केले सूत्रसंचालन नीलिमा पाटील यांनी केले.

जिल्ह्यांत एकमेव शाळा अशी आहे की ज्या शाळेचा पट व गुणवत्ता हे दोन्ही वाढत आहे शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणारा अलिबाग तालुक्यातील एक विद्यार्थी पेझारी झाले शाळेचा आहे. सर्व शिक्षकांचे व शाळा व्यवस्थापन समिती शाळा विकास समितीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

– पंडित पाटील, माजी आमदार
Exit mobile version