सुधागड तालुका रहिवासी सेवा संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव

। ठाणे । वार्ताहर ।

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल बाबू घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख प्रदीप ढवळ यांच्या उपस्थितीत ठाणे येथील सहयोग मंदिर हॉल, घंटाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी मुलांना मोबाईल आणि टॅब वापरताना सायबर क्राईमपासून सावध राहण्याचे आवाहन केले. सुधागडातील नांदगाव हायस्कूलचे माजी प्राचार्य बळीराम निंबाळकर यांना सुधागडभूषण,ज्येष्ठ सल्लागार शिवाजी दळवी यांचा जीवनगौरव,सुरेश मेश्राम यांना सुधागडमित्र पुरस्कारान सन्मानित करण्यात आले .याशिवाय पॉवरलिफ्टिंगपटू सुश्मिता देशमुख, ढोलकीपटू तेजस मोरे यांचाही सन्मानचिन्ह देउन सत्कार करण्यात आला. सेजल प्रमोद खेरटकर, पियुष प्रदीप खेरटकर यांनी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीण झाले त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी विठ्ठल घाडगे, राजू पातेरे,वसंत लहाने, प्रकाश शिलकर, खजिनदार विजय पवार,अविकांत साळुंके, विठ्ठल खेरटकर, शिवाजी दळवी, सुधीर मांढरे, गणपत डिगे, सुरेश शिंदे, चंद्रकांत बेलोसे, रघुनाथ सागळे, विजय जाधव, राकेश थोरवे, सुनील तिडके, दत्ता सागळे, भगवान तेलंगे रघुनाथ इंदूलकर, अनिल सागळे, हरिश्‍चंद्र मालुसरे, गजानन जंगम, मोहन भोईर, अजय जाधव, बबन चव्हाण, अनिल चव्हाण, जयगणेश दळवी वैशाली खेरटकर,वीणा घाडगे, प्रमिला लहाने, विमल चोरगे , सुलोचना जाधव, शारदा लाड, तीर्था डिगे तसेच सुधागड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मंडळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version