। माणगाव । प्रतिनिधी ।
मानगड परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती एस.के. भाटे माध्यमिक विद्यालय बोरवाडी येथे अध्यक्ष नितीन पवार यांचा रविवारी (दि.18) ‘विद्यार्थी-पालक मार्गदर्शन मेळावा’ संपन्न झाला.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शीतल धडके, महेश पाटील, प्रविण ओटवकर, राजेश जोरकर, शरद भद्रिके, स्वरा म्हामूणकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
श्रीमती एस. के भाटे विद्यालयाने पालक संपर्क व जागृती या उद्देशाने हा मेळावा आयोजित करुन नवीन शैक्षणिक उपक्रम सुरु केला आहे. एनएमएमएस शालेय राष्ट्रीय शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत पास झालेले विद्यार्थी, शासकीय चित्रकला इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा-2023 व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन माणगांव दिव्यांग गटात द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी या विशेष प्राविण्य मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शकशीतलजी धडके यांनी उद्बोधक मार्गदर्शन करताना पाल्याचा आहार, सवयी व पाल्याविषयी घ्यावयाची काळजी, जबाबदारी या विषयी मार्गदर्शन केले. महेश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सायबर क्राईम कसा होतो? मोबाईलचा वापर काळजीपूर्वक कसा करावा या विषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.