। अलिबाग । प्रतिनिधी ।
युआयडी परीक्षेमध्ये पेणमधील प्रायव्हेट हायस्कूल आणि एसव्हीएम कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. युनायटेड वर्ल्ड इस्टीट्युड ऑफ डिझाईन (युआयडी) अहमदाबाद सारख्या अग्रगण्य कॉलेजमधील 90 हजारहून अधिक विद्यार्थ्यांमधून कस्तुरी पाटील, दर्शन शेट्टी, मानस पाटील, विश्रांत सुतार, सक्षम वारंगे, हर्ष पाटील व वेदांत घोडिंदे या 7 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. रायगड जिल्ह्यातून 17 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. सर्व विद्यार्थी पेण प्रायव्हेट हायस्कूल आणि एसव्हीएम कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यांनी पीआरओ आयआयटी पेण ब्रांचमध्ये युनायटेड वर्ल्ड इस्टीट्युड ऑफ डिझाईन (युआयडी) परीक्षेसाठी प्रशिक्षण घेतले आहे. श्रेयस आणि राहूल यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.