प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची वेशभुषा

|सारळ| वार्ताहर |

जनता शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा सारळ येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांनी शिवराय, त्यांचे कुटुंबिय व स्वराज्य निर्मितीच्या कार्यात योगदान केलेल्यांच्या वेशभुषा केल्या. दरम्यान, शिवरयांची आरती म्हणत लेझीमच्या ठेक्यावर दगडी शाळा सारळ ते सारळ गावातील चव्हाटयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संतोष मढवी, प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

किहीम ग्रामपंचायतीतर्फे शिवजयंती साजरी


| सोगाव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपसरपंच मिलिंद पडवळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष किर, जान्हवी वाघे, निधी काठे, नूतन थळे, जागृती झेरंडे, कल्पिता आमले, ग्रामसेवक बाबुराव वनवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मापगाव येथे शिवजयंती उत्साहात

| सोगाव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मोठ्या प्रमाणात फुलांनी सजवण्यात आले होते. महाराजांच्या प्रतिमेला प्रशासक साळावकर यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यानंतर माधुरी भोईर, सुनिल थळे व ग्रामस्थांनी पूजन व पुष्पहार अर्पण केले.

यावेळी सागर गावंड, ऋत्विज राऊत, यश मापगावकर यांनी मानवंदना दिली. तसेच यावेळी गणपतीची आरती व शिवाजी महाराज यांची आरती घेण्यात आली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात राजिप शाळा मापगाव येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोर कारकीर्द बाबतीत विद्यार्थ्यांनी भाषणे सादर करत सर्व उपस्थितांची मने जिंकली. तर सागर, यश, ऋतिक या विद्यार्थ्यांनी लोकगीते सादर उत्साह निर्माण केले तसेच सागर गावंड यांनी शिवाजी महाराज यांच्या विषयी स्तुतीपर भाषण केले. या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या व कलाविष्कार सादर केलेल्या सर्वांनाच प्रशासक व माजी सरपंच सुनिल थळे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. शिवजयंती कार्यक्रमाला मापगाव पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चोंढी येथे शिवरायांना अभिवादन

| सोगाव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे शिवजयंतीच्या निमित्ताने स.म.वडके चोंढी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भव्य मिरवणूक काढली होती. मिरवणूक सकाळी नऊ वाजता वडके शाळेपासून चोंढी नाका ते पुन्हा वडके विद्यालय दरम्यान जय शिवाजी, जय भवानीच्या जयघोषात काढण्यात आली. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान केलेल्या शिवाजी महाराज यांचे व मिरवणुकीचे स्वागत करत सरपंच पिंट्या गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.

या मिरवणुकीत स.म.वडके विद्यालयाचे अध्यक्ष काका ठाकूर, सरपंच पिंट्या गायकवाड, सुधीर गायकवाड, संजना पाटील, प्रिती गायकवाड, निवेदिता भोईर, मंगेश आमले, ओमकार आमले, रूपेश लाड, नरेश भोईर, संदेश भोईर, नदीम आत्तार, ऋतिक चव्हाण, रोहन कातूर्डे, राजेंद्र चव्हाण, प्रसन्न कातूर्डे, संदेश पाटील, विकास जाधव, राजू शिंदे, दिनेश कातूर्डे, विद्यार्थी, शिक्षक व चोंढी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Exit mobile version