। नवी मुंबई । वार्ताहर ।
वाशी तरण तलावात अग्नेल शाळेत शिकणार्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्यांचा स्विमिंग पुलात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे. मयूर ढमाले असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो नेरुळ येथे राहत असून फादर अग्नेल शाळेत अकरावीत शिकत होता. आज एक ते दीडच्या सुमारास क्रीडा तासिकेत पोहण्यासाठी असलेल्या समूहास पोहण्याचे धडे दिले जाणार होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्विमिंग पुलात उतरविण्यात आले. यात अनेकांना पोहता येत होते, मात्र पोहण्याच्या विविध स्पर्धेसाठी पोहण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. पाण्यात उतरलेला मयूर हा खोल पाणी क्षेत्रात गेला व तेथेच बुडाला.