विद्यार्थ्यांनी घेतला अग्निसुरक्षा प्रात्यक्षिकांचा अनुभव

| उरण । वार्ताहर ।
राष्ट्रीय अग्निसुरक्षा सप्ताहानिमीत्त एन ए डी केंद्रीय विद्यालय कारंजा येथे विद्यार्थ्यांसांठी अग्निसुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सी आय एस एफ युनिट ओएनजीसी मुंबई ने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अग्निशमन दलाच्या जवानांकडून विद्यार्थ्यांनी आग्नीसुरक्षा प्रात्यक्षिकांचा आनुभव घेतला. अग्नी सुरक्षा सप्ताहा निमित्त आयोजीत या अग्निशमन प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमात विद्यालयाच्या 600 विद्यार्थ्यांनी व 25 शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रात्याक्षिकांसह सह अग्निशमन प्रशिक्षण देण्यात आले.या मध्ये आग लागू नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहीजे ,लागल्यास ति भडकू नये म्हणून कोणती उपाययोजना करावी.तसेच आग लागल्यावर ती कशा प्रकारे विझवावी.आजूबाजूच्या परिसराची कशी काळजी घ्यावी याची प्रात्याक्षिकासह विद्यार्थ्यांना माहीती देण्यात आली.

Exit mobile version