| पेण | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज पेण यांच्या वतीने तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी जी काही मेहनत घेतली आहे. ते पाहता सर्व विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक दर्जा उंचावावा असे प्रतिपादन बालमोहन विद्यामंदिर मुंबई दादरचे निवृत्त मुख्याध्यापक सदाशिव पाटील यांनी केले आहे. पुढे त्यांनी सांगितले की, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आज शिक्षणाची गंगा शासनाने दारोदार पोहचविली आहे या संस्थेत शिकत आहात त्या संस्थेचे नाव तेव्हाच मोठे होईल जेव्हा तुम्ही शिक्षण घेउन उच्च पदावर जाणार तेव्हाच आपल्या पालकांबरोबर संस्थेचे नाव ही मोठे झालेले असेल शिक्षणाला दुसरा पर्याय नाही अथवा शिक्षणाला शॉटकर्ट नाही. त्यामुळे शिक्षण घ्या स्वतःबरोबर संस्थेचे नाव ही मोठे करा.
सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज पेण या संस्थेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पी.डी.पाटील, चिटणीस मोरेश्वर म्हात्रे, सदस्य नरेंद्र पाटील, धिरज पाटील, राजेश पाटील, आप्पा धनावडे, प्राचार्य एस.एच.नाईक, उपप्राचार्य एल.एल.पाटील, सीईओ.सतिश तेलंगे, शिक्षक प्रतिनिधी एस.एस.मोरे आदिंसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी येथील माजी विद्यार्थी संकेत म्हात्रे यानी पोलीस खात्यामध्ये सेवा करताना क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन अंतराष्ट्रीय स्तरावर पोहण्यात आपली छाप पाडली म्हणून त्याचा खास सत्कार करण्यात आला. तसेच उच्च शिक्षण घेऊन नाव लौकीक केलेल्या विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते ज्ञानप्रभा या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.







