। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील खांब येथील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेने मागील काही वर्षांपूर्वी ऐतिहासिक ठराव केला आहे. संस्थेच्या तिनही विद्यालयात वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्यार्या विद्यार्थ्याला 1 मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाचा बहुमान देण्यात येतो. या ठरावानुसार खांब येथील श्री.रा.ग. पोटफोड विद्यालयातील तनुष्का अधिकारी, चिल्हे येथील श्रमिक विद्यालयातील संस्कार कान्हेकर व विठ्ठलवाडी-राजखलाटी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील तन्वी गायकवाड या तीन विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेत ध्वजारोहणाचा बहुमान देण्यात आला. त्यामुळे या नाविण्यपूर्ण निर्णयाचे चेअरमन महेंद्र पोटफोडे आणि सर्व संस्थाचालकांचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.