बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यातचे

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

मुख्यमंत्री माझी शाळा सूंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र पाली यांच्यावतीने पर्यवेक्षक डॉ यशवंत वारगुडे आणि आरोग्य सेविका उज्वला तांबडे यांनी दिली.

आई-वडिलांबरोबर मुलांच्या जीवनशैलीत आहाराच्या सवयीमध्ये बदल होताना दिसतात. जीवनशैलीत बदल झाला त्यानुसार खेळण्याची सवयी बदलल्या. मुले मोकल्या मैदानात खेळण्या ऐवजी घरातच कॅम्पुटर मोबाईल गेम्सचा अति वापर करू लागले. त्यांचे जीवनमान बदलामुळे त्याचे आयुष्य बदलून गेले. त्यामुळे साहजिकच त्यांचे आरोग्य व त्यांचे दुष्परिणामामुळे लहान वयातच मधुमेह, स्थूलता, नेत्र विकार यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. लहान मुलांचे वाढते वजन फास्टफूडचे अतिरिक्त प्रमाण यामुळे कार्बोनेटचे वाढते प्रमाण यामुळे मुलांमध्ये मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे असे डॉ. वारगुडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

जीवनशैलीचे आरोग्यावर परिणाम
बदलत्या जीवनशैलीमुळे मुलाचे मैदानी खेळ बंद झाले. त्यामुळे शारीरिक हालचाल कमी होऊ लागली. कॅम्पुटर गेम्स, टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्स यासारखे आकर्षण वाढल्याने मुले घराबाहेर पडत नाही त्यामुळे शरीरातील कॅलरीज नष्ट होत नाहीत. एकीकडे मैदानी खेळ कमी झाल्यामुळे स्थूलता वाढत चालली आहे.आजची मुले फास्टफूड बिस्किटे पेस्ट्रीज सॉफ्ट ड्रिंक इत्यादीचे आहारात प्रमाण वाढले आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे कॅलरीचे प्रमाण जास्त आहे तर पोषक घटक कमी आहेत यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्थूलता वाढत चालली आहे. अतिवजनामध्ये मुलांच्यामध्ये मधुमेह ,उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हृदयविकार पॅरॅलीसेस होण्याच्या शंका वाढत चालले आहेत.
प्रतिबंधात्मक उपाय
मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करणे. शारीरिक व्यायामाचे महत्त्व पटवून देणे. योगासने करणे,नियमित पोषक सकस आहार घेणे. खाण्याच्या पद्धतीत बदल करणे.टीव्ही,मोबाईल यांचा वापर कमी करणे. सायकल चालवणे, पोहणे, धावणे या प्रकारात गुंतवून ठेवणे.
Exit mobile version