विद्यार्थी रमले गणितीय क्रियांमध्ये नेणवली शाळेत गणितोत्सव उत्साहात आयोजन

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
आंतरराष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन पंचायत समिती पाली व नेणवली शाळा यांच्यामार्फत 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत गणितोत्सवाचे आयोजन राजीप शाळा नेणवली येथे करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी अंतर्गत विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारत सरकार द्वारे निपुण भारत या अभियानांतर्गत संख्याज्ञान व पायाभूत साक्षरता हा उद्देश ठेवून या गणित उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात गणिती परिपाठ अंतर्गत गणिती बडबडगीते, गाणी गणिती गोष्ट त्याचबरोबर गणितीय रांगोळी, गणिती चित्रकला स्पर्धा फलकलेखन, गणितावर आधारित प्रश्‍नमंजुषा, गणित कोडी व कूटप्रश्‍न तसेच गणितपेटी साहित्य व विद्यार्थ्यांनी केलेल्या गणिती साहित्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष हरपाल, उपशिक्षक राजेंद्र अंबिके व गणपत वरगडे यांनी संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन केले.

Exit mobile version