| रोहा | प्रतिनिधी |
रोहे शहरातील ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था व रिसबूड परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावी गटासाठी ‘35 वर्षाच्या वयामध्ये मी स्वतःला काय खाऊ घालेन?’ या विषयावर स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत तालुक्यातील 14 शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या भावी पिढीने कागदावर आपल्याच भविष्याचा लेखाजोका मांडल्याने आयोजक व पाहुणे अंचबीत झाले. या स्पर्धेत तनिष्का आपणकर हीने प्रथम क्रमांक पटकविला असून, ऋतिका सावंत ही द्वितीय तर एंजल फर्नांडिस हीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर, उत्तेजनार्थ म्हणून मृण्यमयी दळवी, संद्या मेहता, दिव्या किर, अक्षरा ठाकूर यांना देखील कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. राहुल मराठे व अन्य प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या स्पर्धेत निबंधांचे परीक्षण म्हणून माधव दाते व मळेकर यांनी काम पाहिले.







