विद्यार्थ्यांनो, गरुडझेप घ्या

स्पर्धा परीक्षा केंद्र उपक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शन

| नवीन पनवेल | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यामधील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अधिकाधिक प्रोत्साहित करण्यासाठी गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ घेऊ शैक्षणिक क्षेत्रात गरुडझेप घ्या, असे आवाहन मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम रायगड जिल्ह्यात पुढे सुरू राहणार आहे. हा उपक्रम माध्यमातून सर्वांना ज्ञात व्हावा आणि आपल्या परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा

डॉ. महेंद्र कल्याणकर
विभागीय आयुक्त

विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून एमपीएससी गट मबफ व गट मकफ संयुक्त पूर्वपरीक्षा 30 एप्रिल 2023 च्या परीक्षेच्या पाश्‍वर्र्भूमीवर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले. या कार्यशाळेचे जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड तसेच जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या फेसबुक पेज व यू-ट्यूबद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे.

नवनाथ वाघ यांनी चालू घडामोडीफ या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात अजित गायकवाड यांनी अर्थशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले. महेश शिंदे यांनी मएमसीक्यू सॉल्व्हिंग टेक्निक्सफ आणि मपरीक्षेच्या दिवसांचे मनियोजन या विषयावरील मार्गदर्शन केले. तर श्रीकांत जाधव हे मभूगोलफ या विषयावर मार्गदर्शन केले. नंदकुमार पाटील यांचे मइतिहास- समाजसुधारकफ तर दुपारच्या सत्रात लक्ष्मण नखाते यांचे मविज्ञानफ या विषयावर मार्गदर्शन लाभले.

या कार्यशाळेप्रसंगी पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथून उत्तम मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात आले. तीन दिवसात विद्यार्थ्यांनी यापूर्वी केलेल्या अभ्यासाची उजळणी घेण्यात आली. शिबिरासाठी पनवेल, खालापूर, कर्जत, उरण व पेण या पाच तालुक्यातील विद्यार्थी आले आहेत. पहिल्याच दिवशी 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला आहे.

गरुडझेप या स्पर्धा परीक्षा अभ्यास उपक्रमामध्ये आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील 6 हजार 336 विद्यार्थ्यांनी गरुडझेप या अ‍ॅपवर आपली नोंदणी केलेली आहे. शिवाय रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्याच्या ठिकाणी गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सुरू आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत पेण आणि अलिबाग या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधांनी युक्त गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका अशी स्वतंत्र इमारत देखील उभी करण्यात आली आहे.

गरुडझेप या विनामूल्य पद्वारे देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन केले जाते. या पवर स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाविषयी संदर्भासाठी ऑनलाईन लेक्चर्स, महत्त्वाची संदर्भ पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गरुडझेप या विनामूल्य अ‍ॅपचा तसेच या कार्यशाळेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

Exit mobile version