। नागोठणे । प्रतिनिधी ।
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात मंगळवार (दि.18) नोव्हेंबर रोजी नशामुक्त अभियानांतर्गत नशामुक्तीची विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. दिनेश भगत यांनी विद्यार्थ्यांना नशा मुक्त महाविद्यालय ठेवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयात तंबाखू, गुटखा व अन्य नशायुक्त पदार्थ विकण्यास व बाळगण्यास प्रतिबंध असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी केले. याप्रसंगी प्रा. डॉ. संदेश गुरव, प्रा. डॉ. विजय चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोहर शिरसाठ, डॉ.विलास जाधवर, प्रा. हेमंत जाधव, प्रा. निलम महाले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्त महाराष्ट्राची शपथ
