| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
अतिवृष्टीमुळे माणगाव तालुक्यातील भिरा धरणाची धोक्याची पाणी पातळी वाढल्यामुळे गुरुवारी (दि. 19) धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. परिणामी, मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडजवळील गोवे गावात पाणी शिरले होते. यावेळी शाळेतून घरी जाणारे पाच लहान विद्यार्थी वाटेत अडकून पडले होते. त्यांना लागलीच सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी सुखरूप सुरक्षित ठिकाणी हलविले. सुरक्षा जॅकेट घालून या विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले व खासगी वाहनातून सुरक्षित स्थळी नेण्यात आले.







