| आगरदांडा | प्रतिनिधी |
जागतिक वन्य जीव सप्ताहाचे औचित्य साधत फणसाड वन्य जीव अभयारण्यात मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील नूतन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नुकतीच जंगलभ्रमंती करून जैवविविधतेचा मनमुराद आनंद लुटला.
सहाय्यक वन संरक्षक मनोहर दिवेकर,वनक्षेत्रपाल नारायण राठोड यांचे मार्गदर्शनाखाली नर्सिंग कॉलेजच्या 48 विद्यार्थ्यांनी अभयारण्यात पायवाट तुडवीत इथल्या निसर्ग गाणी, बशी तलाव, निरीक्षणासाठी उभारलेल्या मनोर्यांना भेट देत वन्यप्राणी, पक्षी, कीटक, कोळी, रंगीबेरंगी फुलपाखरे, बेडूक तसेच वृक्षांच्या विविध प्रजाती व वेली, रानफुलांची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. यावेळी ग्रीन वर्क्स ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी देशी व विदेशी पक्ष्यांची शास्त्रोक्त माहिती दिली. यावेळी वनपाल आदेश पोकळ, वन संरक्षक अरुण पाटील व कर्मचार्यांनी विशेष सहकार्य केले.