। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एका नामांकित शाळेतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोणत्या मुलीला मासिका पाळी आली आहे हे तपासण्यासाठी चक्क विद्यार्थिनींचे गणवेश उतरवून तपासणी करण्यात आली. याबाबत मुलींनी आपल्या पालकांकडे तक्रार केल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
शहापूरच्या आर एस दमानी शाळेतील स्वच्छतागृहामध्ये रक्त सांडल्याचे आढळून आले. त्यानंतर कोणत्या मुलीला मासिका पाळी आली आहे हे तपासण्यासाठी चक्क विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी करण्यात आली आहे. सहावी ते दहावीच्या सुमारे सव्वाशे विद्यार्थीनींसोबत हा प्रकार घडला आहे. विद्यार्थिनींनी घरी येऊन हा प्रकार सांगितल्यानंतर संतापलेल्या पालकांनी शाळा आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तसंच मुख्याध्यापिकेसह एका महिला कर्मचाऱ्यास अटक केली आहे.







