। पनवेल । वार्ताहर ।
प्रभाग क्र 18 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञान अभ्यास वर्ग ज्येष्ठ नागरिक हॉल येथे येथे आयोजित करण्यात आला होता. तीन दिवसांच्या या अभ्यासवर्गाला ज्येष्ठ नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुवर्णा तोंडुलकर यांनी आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची विस्तृत माहिती दिली. सध्या सगळ्या ज्येष्ठांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला स्मार्टफोनचा वापर कशा प्रकारे करावा याबद्दलची माहिती देण्यात आली व त्याचे प्रात्याक्षिक ही करून घेण्यात आले. माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. अभ्यासवर्गाला जयवंत गुर्जर, मोहिनी पाटील, वसुधा सोलंकी, स्वाती पवार, हर्षा ठक्कर, गीता शाह, निलेश वाडेकर, रोहन वाजेकर, डॉ.आदित्य तोंडुलकर, प्रथमेश पुंडे, कैलास गावडे आणि विद्यासागर सोनावणे यांनी या अभ्यास वर्गात विशेष सहभाग घेतला.