पीएनपीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

। म्हसळा । वार्ताहर ।

म्हसळा तालुक्यातील प्रभाकर पाटील एज्यूकेशन सोसायटीची पाष्टी माध्यमिक शाळा ही गेल्या दोन वर्षांपासून मुंबईच्या भारतीय मानक संस्थेशी निगडीत आहे. यावेळी भारतीय मानक संस्थेच्यावतीनेऔद्योगिक क्षेत्रातील मानक निर्धारित कसे होतात, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देण्याच्या हेतूने एक दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.

या वर्षीच्या अभ्यास दौर्‍यात पीएनपी पाष्टी शाळेने सक्रिय सहभाग घेतला होता. या अभ्यास दौर्‍यात नवीन पनवेल येथील जुबिलीयंट फर्मा अँड केमिकल लॅब येथे भेट दिली. या लॅबमध्ये विविध प्रकारचे पदार्थ जसे पाणी, दूध, खाद्यपदार्थ, खते, जीवनावश्यक वस्तू यांचे मानक कसे तपासले जातात, तसेच त्यांना प्रमाणित करण्याचे मानके कोणती, इत्यादी बाबत सविस्तर माहिती घेतली. याबाबतची माहिती कंपनीच्या मंजुषा आणि म्हामुणकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी पीएनपी पाष्टी शाळेतील इयत्ता 8वी आणि 9वीचे एकूण 25 विद्यार्थ्यांसह विज्ञान शिक्षक विनयकुमार सोनवणे उपस्थित होते.

Exit mobile version