सुभद्रा अनंत पाटील चषक स्पर्धा

| अलिबाग | वार्ताहर |

रायगड जिल्ह्या बुद्धिबळ संघटना आयोजित स्व: सुभद्रा अनंत पाटील चषक स्पर्धा रविवारी (दि.22) अलिबागमधील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये पार पडली. या स्पर्धेत सन्मिल गुरव, अपेक्षा मरभल, ईशांत करडे, अर्णब पात्रो व वैघा बैजू हे गटात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.


या स्पर्धेच्या उद्घाटनासमयी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, अलिबाग नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनाचे अध्यक्ष विलास म्हात्रे, सचिव सुशील गुरव, पदाधिकारी चंद्रशेखर पाटील, सुरेंद्र दातार, तसेच ॲड. श्रीराम ठोसर, स्नेहल म्हात्रे. अनंत पाटील, जयप्रसाद पाटील, चेतन पाटील, दर्शन पाटील आणि पाटील परिवार उपस्थित होते. या बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी एकूण 186 स्पर्धकांनी या स्पर्धेत वेगवेगळ्या 4 गटांत आपला सहभाग नोंदेवीला होता. त्यामध्ये रत्नागिरी, रायगड, नवीमुंबई व ठाणे जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रत्येक गटवार प्रथम तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ बक्षीसे दिली गेली. बक्षीस समारंभ स्पर्धा आयोजक अनंत पाटील परिवार आणि रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या पदाधिकारी समवेत पार पडला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अंकित जोशी, आविष्कार मरभल, श्रेयस पाटील, सार्थक मिंडे, अमीत कदम , सुशील गुरव अथर्व, दातार यांनी काम पाहिले.

विजयी झालेले स्पर्धक

खुला गटः
प्रथम- सन्मिल गुरव, द्वितीय- आकाश कुमार यादव, तृतीय- साई बलकवडे.

17 वर्षा खालील गटः प्रथम- अपेक्षा मरभल, द्वितीय- गौतम पवार, तृतीय- आर्या जाधव.

13 वर्षा खालील मुलेः प्रथम- अर्नब पत्रों, द्वितीय- अमोघ आंब्रे, तृतीय- अद्वय ढेने.

13 वर्षा खालील मुलीः प्रथम- प्रिशा घोलप, द्वितीय- वैघ्या बैजू, तृतीय- वेधा बैजू.

11 वर्षा खालील मुलेः प्रथम- ईशान कराडे, द्वितीय- आशुतोष प्रसाद, तृतीय- स्वर पटेल.
Exit mobile version