। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठी जुई सुभाष रामभाऊ म्हात्रे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ बुधवार दि 27 एप्रिल रोजी रा.जि. प शाळा मोठी जुई येथे झाला.विविध शिक्षक, विद्यार्थी पालकांनी आपली मनोगते व्यक्त केले. त्यानी 34 वर्षे,2 महिने,9 दिवस त्यांनी सेवा केली. शाळेची,विद्यार्थ्यांची,समाजाची प्रगती कशी होईल यासाठी त्यांची धडपड नेहमी असते.चिरनेर केंद्र प्रमुख टी जी म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी ललिता पाटील,पुरुषोत्तम भोईर, तृप्ती बंडा, वाय. एस पाटील,कौशिक ठाकूर ,हितेंद्र म्हात्रे, महेश गावंड मान्यवर,केंद्रप्रमुख व सर्व शिक्षक वृंद, शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत मोठी जुईचे ग्रामपंचायत सदस्य, पालक वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.