। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील भाकरवड गावचे सुभाष कृष्णकांत पाटील वय वर्ष 55 यांचे बुधवारी (दि.8) ब्रेन हॅमरेज होऊन उपचारा दरम्यान निधन झाले. स्व. सुभाष पाटील हे उत्कृष्ट चालक होते. मुंबई ते अलिबाग येथे चालणार्या जोगळेकर ट्रान्सपोर्टमध्ये त्यांनी बरेच वर्ष चालक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी नेटको टाईल्समध्ये जेसिबी ड्रायव्हर म्हणून पंधरा ते वीस वर्षे सेवा केली. त्यांचे उत्तरकार्य शुक्रवारी (दि.17) तर बारावे रविवारी (दि.19) राहत्या घरी होणार आहे. स्व.पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.