। नाशिक । प्रतिनिधी ।
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे नवोदित कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी विशाखा काव्य पुरस्कार देण्यात येतात. 1 जानेवारी2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत ज्या कवींचा पहिला कविता संग्रह प्रसिध्द झाला आहे अशा कवींनी आपले कविता संग्रह पाठवावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
कविचा पहिलाच कविता संग्रह असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र कवीने जोडणे अनिवार्य आहे,संग्रह मराठी भाषेतच असावा, वयाची अटन नाही, संग्रहाची याआधी इ-आवृत्ती प्रकाशित झालेली नसावी.यासाठी कोणतेही शुल्क नाही. सोबत कवीचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि संपूर्ण पत्ता, संपर्क क्र., इ-मेलइ .
तपशीलासह परिचय पत्र पाठवावे. 5 प्रती, 31 डिसेंबर 2022 पर्यंत पाठविणे,पोस्टाने पाठविणे, कविता संग्रह पाठवण्याचा पत्ता :- प्रा. डॉ. प्रवीणघोडेस्वार, समन्वयक, कुसुमाग्रज अध्यासन, महाराष्ट्र मुक्तविद्यापीठ, नाशिक याबाबतचा तपशील विद्यापीठाच्या ुुु.ूर्लोी.रल.ळप या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.