शेतकऱ्यांना काजू बीसाठी अनुदान

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासनाकडून वित्तीय साह्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल. ही गोष्ट विचारात घेऊन 2024 च्या काजू हंगामासाठी शासनाने काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य काजू मंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी दिली. यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्याच्या सात-बारावर काजू लागवडीखालील क्षेत्र किंवा झाडांची नोंद असणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षम काजुच्या झाडांची संख्या व त्यापासून प्राप्त काजू बी उत्पादन हे संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित करणे, कृषी उत्पन्न बाजार समितीकडील नोंदणीकृत परवानाधारक काजू व्यापारी, नोंदणीकृत सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ व नोंदणीकृत काजू प्रक्रियादार यांना काजू बीची विक्री केलेली असणे तसेच काजू उत्पादक शेतकऱ्याने विक्री केलेल्या काजूच्या विक्री पावतीवर नोंदणीकृत खरेदीदाराचा जीएसटी क्रमांक देणे गरजेचे आहे.

Exit mobile version