• Login
Monday, March 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय संपादकीय

यशस्वी सांगता

Krushival by Krushival
December 10, 2021
in संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मोदी सरकारच्या वादग्रस्त तीन शेती कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळ शेतकर्‍यांनी चालवलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली असून आपल्या प्रमुख मागण्या मान्य करून घेतल्यावर गुरुवारी शेतकरी संघटनांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. आता सर्व आंदोलक आज शनिवार 11 डिसेंबरपासून आपल्या घरी जाण्यास निघतील. आंदोलन मागे घेतल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी फतह अरदास म्हणजे विजय प्रार्थना सादर केली गेली. अकरा डिसेंबरला आंदोलन सुरू असलेल्या सीमेवरील भागात विजय मिरवणूक काढली जाणार असून त्यानंतर सगळे परतीच्या मार्गाला लागतील. त्यानंतर बुधवारी 15 डिसेंबरला सगळे शेतकरी नेते अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी जातील आणि त्यानंतर पुढील वर्षी 15 जानेवारीला दिल्लीत होणार असलेल्या संयुक्त किसान मोर्चा संघटनेच्या बैठकीच्या तयारीला लागतील. शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा स्पष्ट झाला आणि सुटला असला तरी या निमित्ताने एकत्र आलेल्या या शक्तीची देशाच्या पुढील धोरणासाठी काय दिशा असेल, हे 15 जानेवारी नंतर कळू शकेल. गेले दोन दिवस शेतकरी आंदोलन समाप्त होण्याच्या दृष्टीने घडामोडी सुरू झाल्या होत्या. कारण केंद्र सरकारकडून मंगळवारी आंदोलक नेत्यांना त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठीचे आश्‍वासन देणारे एक पत्र पाठवले गेले होते. त्यात सरकार आता शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करण्यास तयार असून त्या दिशेने कोणती पावले टाकत आहे, याचा तपशील होता. या मागण्यात प्रमुख असलेला किमान हमीभावाच्या मुद्द्यावर सरकारने समिती स्थापन करण्याची तयारी करीत असल्याचेही आश्‍वासन त्यात होते. त्याच बरोबर शेतकरी आंदोलनात ज्या आंदोलकांवर खटले दाखल करण्यात आले होते, ते विनाशर्त मागे घेणे, या आंदोलनात मरण पावलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणे, वीजबील मागे घेणे, आदीही कळीच्या मुद्द्यांवर सरकार चर्चेस तयार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सरकारने घेतलेली सकारात्मक भूमिका आणि त्यानुसार त्या दिशेने पडत असलेली पावले लक्षात घेऊन आंदोलन पुढे रेटत राहण्यात अर्थ नव्हता. शेतकर्‍यांच्या घनकचरा संबंधीचे विधेयकही मागे घेतले जाईल, असे आश्‍वाासन दिले गेले आहे. शेतकर्‍यांच्या या दृढनिश्‍चयी निर्धारापुढे सरकारला नमते घ्यावे लागले ही गोष्ट महत्त्वाची आहे. तसेच, विजयाच्या उन्मादात या निमित्ताने सुरू झालेला शेतकर्‍यांच्या हक्कांचा विषय संपलेला नाही हे लक्षात घेऊन सजग असण्याचीही खूप गरज आहे. म्हणूनच केंद्र सरकारने आता दिलेली लेखी व तोंडी आश्‍वासने पूर्ण केली नाहीत, तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे हे वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली आणि या आंदोलन समाप्तीच्या दिशेने पहिले पाउल पडले. मात्र सदर कायदे मागे घेण्याबरोबरच, केल्या जात असलेल्या अन्य मागण्यांवर सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नाही, तोवर आंदोलन थांबणार नाही, असे किसान मोर्चातील शेतकरी नेत्यांनी जाहीर केले होते. सरकारने संसदेत कायदे रद्द करून घेतले आणि त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरीही झाली. तथापि, ती एक मागणी होती आणि आंदोलन मागे घेण्यासाठी शेतकर्‍यांनी अन्य रास्त मागण्या केल्या होत्या ज्या अन्यायकारक पद्धतीने शेतकर्‍यांवर लादण्यात आल्या होत्या. सरकारच्या लेखी प्रस्तावानंतर आणि लेखी आश्‍वासनाच्या पूर्ततेनंतर हे आंदोलन मागे घेतले गेले. इतिहासात नेहमी अशी वेळ येते जेव्हा सत्ताधीशांचे बळ उठून दिसते आणि दुबळा वाटणारा शेतकरी, कामकरी पराभूताच्या छायेत असतो. मात्र याच इतिहासाने हेही अनेकदा दाखवून दिले आहे की शेतकर्‍यांनी सावकार असो की सरकार, सगळ्यांना पराभूत केले आहे. कारण शेतकर्‍यांची नाळ मातीशी असते आणि त्यांच्या मागण्या न्याय्य असतात. आता कळीचा प्रश्‍न आहे तो हमीभावाचा! त्याचा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या समितीत केंद्र, राज्य सरकार आणि संयुक्त किसान मोर्चाच्या प्रतिनिधींसह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असतील. सरकारचे आडमुठे धोरण अचानक लवचिक कसे बनले याबाबत अनेक तर्क आहेत. एक म्हणजे येत्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका. त्यानंतर सरकार पुन्हा घुमजाव करू शकते. हे लक्षात ठेवून शेतकरी संघटनांनी सतत सतर्क राहिले पाहिजे

Related

Tags: Editorialmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

समीर-क्रांती वानखेडे पुन्हा न्यायालयात

Next Post

बँक खासगीकरण करण्याचा अट्टाहास का?

Krushival

Krushival

Related Posts

रस्त्यावरील गतिरोधकांना पांढऱ्या पट्टयाची गरज
अलिबाग

रस्त्यावरील गतिरोधकांना पांढऱ्या पट्टयाची गरज

February 14, 2024
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

रात्र थोडी सोंगे फार

January 14, 2024
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

 रामाच्या नावाने 

January 12, 2024
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

निकालाचे राजकारण

January 11, 2024
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

मुंबईला तिसरा डबा  

January 10, 2024
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

भारतीय नावांचे कायदे 

January 10, 2024
Next Post
बँक खासगीकरण करण्याचा अट्टाहास का?

बँक खासगीकरण करण्याचा अट्टाहास का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?