। आगरदांडा । प्रतिनिधी ।
नुकतीच प्रबुद्ध एकपात्री अभिनय स्पर्धा 2022 संपन्न झाली. या स्पर्धेत एकाहून एक सरस अभिनय पहायला मिळाले. या स्पर्धेत मुरूड जंजिरा कुंभारवाडा येथील प्रभात नाईक यांनीही सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाले आहे. प्रथम क्रमांक सुवर्ण थोरात, विरार, द्वितीय क्रमांक सेजल जाधव, मुंबई आणि खास प्रेक्षक पसंती अरुणा देवचक्के, औरंगाबाद यांना मिळाला. गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेत हे पाचवे क्रमांक पटकाविले आहे. तसेच स्पेत्रम अकॅडमी, नाशिक यांनी मराठी राज भाषा दिनानिमित्त एक ऑडियो-व्हिडिओ स्पर्धा आयोजित केली होती. यात प्रभात नाईक यांनी मराठी राज भाषा महत्त्व सांगणारे ऑडियो तयार केले होते. या ऑडियोलासुद्धा उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. प्रभात नाईक हे पनवेल येथे जिल्हा परिषद शाळा तोंडरे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते नेहमीच विविध स्पर्धात भाग घेत असतात. आणि मुरूड जंजिरा गावाचे नाव उंचावत असतात. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शिक्षक वृंद, मित्र परिवार यांच्याकडून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.