। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
श्रीवर्धन शहराला पाणी पुरवठा करणार्या रानवली धरणामध्ये गुरुवारी सायंकाळी एक युवक बुडाला होता. ही बातमी कळताच पोलिसांनी शोधकार्य सुरु केले. मात्र अंधारामुळे शोध घेण्यास अडथळा निर्माण झाला. अखेर शुक्रवारी (दि.6) सकाळी स्थानिक मच्छीमार व साळुंखे रेस्न्यू टीमला मृतदेह शोधण्यात यश आले.






