। हैदराबाद । वृत्तसंस्था ।
तेलंगणा आणि छत्तीसगढच्या सीमावर्ती भागात सुरु असलेल्या चकमकीत 11 नक्षलींना कंठस्नान घालण्यात यश आले. तर 6 जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. किस्तराममधील जंगल भागात नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरु आहे. तेलंगणा पोलीस, छत्तीसगढ पोलीस आणि सीआरपीएफने ही संयुक्त कारवाई केली, अशी माहिती तेलंगणातील भद्राद्री कोथागुडेम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांनी दिली.गेल्या काही महिन्यांत, जिल्ह्यातील बंडखोरग्रस्त भागात कसून शोध घेण्यात येत आहे, असे एका अधिकार्याने पीटीआयला सांगितले. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत अधिक तपशील उपलब्ध झालेला नाही.