ऑनलाईन राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच प्रशिक्षण व प्रमाणपत्र परीक्षेत यश

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या ऑनलाइन राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच प्रशिक्षण व प्रमाणपत्र पाठ्यक्रमसाठी दि. 15 ते 16 मे , 22 ते 23 मे ,29 ते 30 मे रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत चंद्रशेखर पाटील,अमित कदम, विलास म्हात्रे आणि हेमंत राणे यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. या शिबिरात 182 प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदविला होता.
या शिबिरात शिकविलेल्या अभ्यासक्रमावर आधारित ही पंच परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेस 168 प्रशिक्षणार्थी बसले होते. एकूण 168 प्रशिक्षणार्थीपैकी 44 स्पर्धक अ श्रेणीत , 59 ब श्रेणीत, 54 क श्रेणीत तर 9 जण ड श्रेणीत उत्तीर्ण झाले. या शिबिरात रायगड जिल्ह्यातून 22 जणांनी भाग घेतला होता त्यापैकी 21 जण परीक्षेस बसले होते. पनवेल मधून 7, अलिबाग मधून 7, कर्जत मधून 1, खालापूर मधून 1, रोहा मधून 2 आणि माणगाव मधून 3 असे एकूण 21 जणांनी परीक्षा दिली होती. या 21 पैकी 14 जणांना ए ग्रेड मिळाली तर बी ग्रेड मध्ये 3 आणि सी ग्रेड मध्ये 4 जण उत्तीर्ण झाले आहेत.

यामध्ये पनवेल तालुक्यातील 1)चंद्रशेखर पाटील 2)अमित कदम 3) हेमंत राणे 4) श्रेया पाटील 5) श्रेयस पाटील यांनी ए श्रेणीत यश नोंदविले. तर 6) गिरीश गडकरी आणि 7) राजीव योगी यांना सी श्रेणी मिळाली आहे.
अलिबाग तालुक्यातून 1) विलास म्हात्रे 2)प्रदीप पाटील 3) गोपीनाथ डंगर 4) सौ.स्नेहल म्हात्रे 5) सुशील गुरव 6)शुभम म्हात्रे यांना ए श्रेणी मिळाली आहे तर 7) राजेंद्र वाघ यांना सी श्रेणी मिळाली आहे.
कर्जत चे 1) सागर वाघमारे यांना ए श्रेणी मिळाली आहे तर रोहा तालुक्यातून 1)रवींद्र जाधव आणि 2)विक्रम शेट्ये यांना ए श्रेणी मिळाली आहे.
खालापूर तालुक्यातील 1 ) सार्थक मिंडे यांना बी श्रेणी मिळाली असून माणगाव तालुक्यातून 1)किशोर देशपांडे 2) आराध्य पूराडकर यांना बी श्रेणी आणि 3) सुदेश पुराडकर यांना सी श्रेणी मिळाली आहे.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले आणि उपाध्यक्ष ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे यांनी तसेच रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी,पनवेल चेस असोसिएशनचे पदाधिकारी या सर्वांकडून यशस्वी प्रशिक्षणार्थी यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
करोना काळातील या ऑनलाइन स्पर्धेत महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेत पनवेलमधील श्रेयस पाटील, श्रेया पाटील व स्वप्नील ठीक यांनी पंच म्हणून मोलाची कामगिरी पार पाडली.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे शाळेत बुद्धिबळ (चेस इन स्कूल ) हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर राबविण्यासाठी स्कूल ट्रेनरसाठी पनवेल मधून चंद्रशेखर पाटील,अमित कदम व श्रेया पाटील यांची निवड झाली आहे. प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून रत्नागिरीचे विवेक सोहनी, नागपूरचा स्वप्नील बनसोड आणि फिडे पंच म्हणून जळगावचे प्रवीण ठाकरे, तर नाशिकचे मंगेश गंभीरे यांनी प्रशिक्षण दिले. समन्वयक म्हणून विलास म्हात्रे आणि आंतरराष्ट्रीय पंच भारत चौगुले यांनी काम पाहिले.

बुद्धिबळाच्या प्रचार व प्रसारासाठी ऑनलाइन आयोजित प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धांमुळे बुद्धिबळ खेळाडूंना व आयोजकांना नवसंजीवनी मिळाली आहे. बुद्धिबळ प्रेमींनी या संधीचा जरूर उपयोग करून घ्यावा, असे आवाहन या निमित्ताने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, उपाध्यक्ष ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे, रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी,पनवेल तालुका बुद्धिबळ असोसिएशनचे पदाधिकारी, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले श्री.चंद्रशेखर एन.पाटील, अमित कदम तसेच सर्व यशस्वी खेळाडू, पंच, प्रशिक्षक या सर्वांकडून करण्यात आले असून बुद्धिबळ खेळासाठी सहकार्य करणार्‍या व प्रोत्साहन देणार्‍या शासकीय व खाजगी क्षेत्रातील सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Exit mobile version