चित्रकला परीक्षेत आंबेत हायस्कूलचे यश

| आंबेत | वार्ताहर |

नुकत्याच घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत सावित्री माध्यमिक विद्यामंदिर आंबेत विद्यालयाने उत्तम सुयश प्राप्त केले आहे. दोन्ही परीक्षेत एकूण 21 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. एलेमेंटरी परीक्षेत कु.मदिया जुम्मल, ऋतुजा म्हाप्रळकर, हर्षदा साळवी, सन्ना हसवारे, वेदांत आंबेकर, सौरभ डोंगरे, आर्यन घरटकर, साहिल जाधव, सौरभ महाडकर, शिवम् शिगवण, मारु हसवारे यांना ‘ब’ श्रेणी, तर श्रवण रेवलेकर, सचित शिगवण हे ‘क’ श्रेणी मिळाली. तर इंटरमिजिएट परीक्षेत कुमारी- सोनाली आंबेकर, श्रुणाली साळवी यांना ‘अ’ श्रेणी श्रीया खापरे, नेहा वाघरे, सिध्दी रेवलेकर, उसामा झटाम, जकरिया मुकादम ‘ब’ श्रेणी तर निधी गजमल हिला ‘क’ श्रेणी मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक श्री. हणमंत लुबाळ सर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व कला शिक्षक यांचे विद्यालयाचे सुजित भोसले यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version