आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाचे यश


| नागोठणे | वार्ताहर |

मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र पदव्युत्तर एम. एससी द्वितीय वर्ष रसायन विभागाचा निकाल नुकताच मुंबई विद्यापीठाने जाहीर केला आहे. या परीक्षेत कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाने यश मिळविले आहे. या परीक्षेत महाविद्यालयाचे 20 पैकी 19 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविली आहे.

या परीक्षेत अनुक्रमे आक्रोश पाटील प्रथम क्रमांक, ऋतिक शिंदे द्वितीय क्रमांक व निखिल हार्नेकर तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सिध्दार्थ पाटील, कार्यवाह पल्लवी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, महाविद्यालय विकास समिती वरिष्ठ सदस्य संजय पाटील, प्र. प्राचार्य डॉ. संदेश गुरव, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिनेश भगत, अभ्यासक्रम समन्वयक प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे व डॉ. विलास जाधवर आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version