रंगोत्सव स्पर्धेत देशमुख स्कूलचे यश

| खोपोली | प्रतिनिधी |

रंगोत्सव स्पर्धेत खोपोलीच्या वसंत देशमुख स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली. या स्पर्घेत अनिकेत शेकापूरकर, अंशिका चौरसिया यांना विशेष प्राविण्य पुरस्कार देण्यात आला. याशिवाय मानवी नेगी, प्रभात मिश्रा आणि उपासना निकम यांनाही पदके देऊन गौरविण्यात आले. निखिल मंडळ आणि निहारिका विश्‍वास यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष उल्हास देशमुख, अध्यक्ष विक्रांत देशमुख, तेजस्वी देशमुख, मुख्याध्यापिका सीमा नाईक, अश्‍विनी वाघुले यांनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक अजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Exit mobile version