महाराष्ट्र पॉवर लिफ्टींग स्पर्धेमध्ये संतोष व सुहानी गावडे या पिता पुत्रीचे यश

। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टींग असोसिएशन व औरंगाबाद द जिल्हा पॉवर लिफ्टींग असोसिएशन यांच्या विद्यमानाने दि.9 ते 10 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे पॉवर लिफ्टींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये संतोष गावडे व सुहानी यांनी सुवर्ण व कास्य पदक मिळविले.
राज्य पॉवर लिप्टींग स्पर्धेमध्ये अलिबाग मधील थळ वायशेत येथील संतोष तुकाराम गावडे यांना सुवर्णपदक व त्यांची मुलगी सुहानी संतोष गावडे यांना कास्यपदक मिळाले आहे. संतोष गावंड हे आरसीएफ थळ या कंपनीमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करतात तर त्यांची मुलगी बारावीचे शिक्षण घेत आहे. त्यांची निवड गोवा येथे होणार्‍या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version