। उरण । वार्ताहर ।
सन 2021 मध्ये संपन्न झालेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उरण तालुक्यातील कळंबुसरे शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. हर्षाली निलेश नाईक ही विद्यार्थीनी उरण तालुक्यात दुसरी आली असून रायगड जिल्हा गुणवत्ता यादीत 23 वी आली आहे.
![](http://krushival.in/grygrars/2022/01/jiya-593x1024.jpg)
तर जिया महेंद्र पाटील हिने शिष्यवृत्ती पटकावली आहे. या यशाने कळंबुसरे प्राथमिक शाळेची गुणवत्ता वाढली आहे. दरम्यान या यशाबद्दल हर्षाली नाईक व जिया पाटील या विद्यार्थिनींचे शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग आणि शिक्षक वृंदाकडून अभिनंदन होत आहे.