| श्रीवर्धन | वार्ताहर |
यावर्षी एस.एन.डी.टी. विद्यापीठाने दिनांक 20-21 सप्टेंबर रोजी एम .एम .पी शाह कॉलेज, माटुंगा येथे युवा महोत्सवाच्या अंतिम फेरी आयोजन केले होते. या महोत्सवाचे उद्घाटन प्रशासक व तंत्रशिक्षण विभागाचे सल्लागार तज्ज्ञ डॉ. प्रमोद पाब्रेकर, विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. नितीन प्रभुतेंडोलकर, प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांच्या उपस्थित पार पडला.
महाराष्ट्र, गोवा, गुजरात अशा विविध राज्यातील 40 महाविद्यालयांनी साहित्य, ललितकला व डान्स इव्हेंट्समध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये महर्षी कर्वे कॉलेजच्या युक्ता निलेश माने व मनाली शैलेंद्र ठाकूर या विद्यार्थिनींनी गुजराती वादविवाद स्पर्ध्येत प्रथम क्रमांक पटकाविला. तर, साक्षी वसंत पाटील हिने हिंदी वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक कमावला. अंजली अनंत मेंदाडकर व प्रियल प्रकाश शिगवण यांनी मराठी वादविवाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. शाह कॉलेजचे अध्यक्ष प्रकाश शाह व माजी विद्यार्थिनी व गुजरात येथे कार्यरत असणार्या विक्री कर अधिकारी करुणा परमार यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला. सर्व विजेत्यांचे व सहभागी विद्यार्थिनींचे कॉलेजचे प्रा. डॉ. डी.पी. राणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले. भविष्यात विद्यार्थिनीच्या कलागुणांना वाव मिळवून देणारे विविध व्यासपीठ उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन प्राचार्यांनी दिले.






