। पेझारी । वार्ताहर ।
रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे वार्षिक शैक्षणिक कृतीसत्र 8 व 9 एप्रिल रोजी एन. एन. पालीवाला उच्च माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे संपन्न झाले. सदर कृतीसत्रांमध्ये मुख्याध्यापक संघामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धांमध्ये को.ए.सो ना.ना. पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पोयनाड या शाळेने भरघोस यश संपादन केले. यामध्ये कोएसो ना. ना. पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पोयनाड हस्तलिखित प्रथम क्रमांक, निबंध स्पर्धा प्रशिक्षित पदवीधर गट संध्या दिवाकर खरसंबळे प्रथम क्रमांक, तर चित्रकला स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावी गटात पायल देशमुख ही द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. सर्व पारितोषिक विजेत्यांचे आणि हस्तलिखित मार्गदर्शक देवेंद्र पाटील व सहभागी शिक्षकांचे शाळेचे चेअरमन माजी आ. पंडित पाटील, शाळा समिती सदस्य सुप्रभात पाटील, ससुमना पाटील, यशवंत पाटील, प्राचार्य के. के. फडतरे, एस. के. पाटील, व्हि. डी. पाटील, तृप्ती पिळवणकर, तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले.







