चित्रकला स्पर्धेत ना.ना. पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे यश

| पेझारी | वार्ताहर |

रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा प्रकारातील चित्रकला स्पर्धेमध्ये को.ए.सो. ना.ना. पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पोयनाडमधील विद्यार्थ्यांना विशेष यश प्राप्त झालेले आहे. सबंधीत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्राथमिक गटामध्ये सोहम पाटील यांनी प्रथम क्रमांक तर वरिष्ठ गटामध्ये पायल देशमुख हिने द्वितीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे चित्रकला शिक्षक देवेंद्र पाटील यांचे को.ए. सो.चे ज्येष्ठ संचालक पंडित पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापक शशिकांत पाटील तसेच, नाना पाटील संकुलातील सर्व शाखांचे प्रमुख, सत्रप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version