ना.ना. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

एनएमएमएस परीक्षेत मिळविली शिष्यवृत्ती
पेझारी | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे इयत्ता आठवीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी) विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये को.ए.सो. ना.ना. पाटील हायस्कूल पोयनाडच्या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यामध्ये काव्य राजेंद्र पाटील (14), सोनल संकेत म्हात्रे (32) तर पायल सतीश देशमुख (62) शिष्यवृत्तीधारक ठरली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल को.ए.सो. चे ज्येष्ठ संचालक माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते कोएसोचे माजी अध्यक्ष लोकनेते अ‍ॅड. दत्ता पाटील तथा दादा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कार्यक्रमात भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी राजिप सदस्या चित्रा पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, कोएसो सहमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक गावडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश म्हात्रे, सुनील राऊत, यशवंत पाटील, मुख्याध्यापक डी.पी. कुलकर्णी, सत्रप्रमुख शशिकांत पाटील, विकास पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कोव्हिड-19 पार्श्‍वभूमीवर शाळा बंद असल्याने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचा ग्रुप स्पर्धा प्रमुख सायली पाटील यांनी तयार करून महाराष्ट्र शिक्षक पॅनेलच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांची दैनंदिन अभ्यासमाला उपलब्ध करून दिली. त्याचा फायदा या विद्यार्थ्यांना झाला. तसेच वर्गशिक्षक अविनाश पाटील व इतर विषय शिक्षकांचेही मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन पंडित पाटील व उपस्थितांनी केले.

Exit mobile version