। म्हसळा । वार्ताहर ।
कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयाने तळा येथील द.ग.तटकरे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या रायगड दक्षिण विभागाचा छपन्नव्वा युवा महोत्सवात यश संपादन केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत सर्व महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेतला होता. वसंतराव नाईक महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात भाग घेत घवघवीत यश संपादन केले.
आफिया फकी- स्टोरी टेलिंग बी ग्रुप, सना खान- वक्तृत्व बी ग्रुप, आर्यन येलवे- वक्तृत्व ए ग्रुप, सारा काठेवाडी व सादिया करबेलकर- वादविवाद ग्रुप बी, अमृता तोडणकर- रांगोळी, आयेशा उंड्रे- कोलाज, ईशरा उंड्रे – पोस्टर मेकिंग, मारूफा पठाण- मेंहदी या विविध स्पर्धेत सहभागी होत यश संपादन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मुश्ताक अंतुले, विश्वस्त सचिव अशोक तळवटकर, वंदना विचारे, सचिव प्रतिनिधी फजल हळदे, विकास समितीचे सदस्य महादेव पाटील, निलम वेटकोळी, प्र.प्राचार्य डी.ए. टेकळे, युवा महोत्सवाचे समन्वयक प्रा. आर.एस. माशाळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि हितचिंतक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नाईक अंतुले महाविद्यालयाचे यश
