| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्याचे 51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुधागड तालुका एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय खवली येथे दि.12, 13 जानेवारी रोजी संपन्न झाले.
या प्रदर्शनात नवघर शाळेतील इयत्ता आठवीची विद्यार्थ्यीनी आर्या वाघमारे हिने 6 वी ते 8 वी या गटात ‘नावीन्यपूर्ण गाव’ हे मॉडेल बनवून सहभाग घेतला होता . भविष्यातील गाव कसे स्वयंपूर्ण असावे हे या प्रतिकृतीमधून प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले होते. तिच्या या प्रतिकृतीसाठी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
या प्रतिकृतीसाठी शाळेतील शिक्षक प्रमोद म्हात्रे, अशोक कुंवर, श्रावस्ती जाधव, आर्यन चव्हाण, कुणाल पाटील या विद्यार्थ्यांनी आर्या वाघमारे हिला प्रतिकृती बनण्यासाठी सहकार्य केले. तिच्या यशाबद्दल केंद्र प्रमुख सुरेश उमटे, शाळेचे मुख्याध्यापक अनिल राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, शाळेतील सर्व शिक्षकांनी आर्या वाघमारेचे अभिनंदन केले.