तालुकास्तरीय स्पर्धेत नेणवली शाळेचे यश

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांच्या संकल्पनेतून संपूर्ण सुधागड तालुक्यांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीकरिता मराठी, गणित व इंग्रजी या स्पर्धेचे आयोजन वावलोळी आश्रमशाळा येथे सोमवार, दि. 25 एप्रिल रोजी करण्यात आले होते.
या स्पर्धा प्रामुख्याने केंद्रस्तर, बीटस्तर व तालुकास्तर याप्रमाणे पार पाडल्या. या स्पर्धांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीकरिता मुळाक्षरे वाचन, अंक ओळख, इंग्रजी शब्द ते इयत्ता सातवीपर्यंत एखाद्या विषयावर तीन मिनिटे बोलणे, इंग्रजी डायलॉग राइटिंग आणि गणिती प्रश्‍नपत्रिका अशा स्पर्धात्मक स्पर्धांचा व उपक्रमांचा अनुक्रमे इयत्ता पहिली ते सातवी कविता समाविष्ट करण्यात आला होता. सर्वप्रथम केंद्रस्तरावर स्पर्धा केंद्रप्रमुख कल्पना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडल्या.
यामध्ये केंद्रांतर्गत इयत्तानिहाय प्रथम आलेले विद्यार्थी बीटस्तरासाठी पात्र झाले. बीटास्तरांमध्ये प्रथम तीन क्रमांक तालुकास्तरासाठी पात्र झाले आणि तालुका स्तरावर प्रमुख तीन क्रमांकांना गटशिक्षण अधिकारी यांच्यामार्फत बक्षीस देण्यात आले. यामध्ये नेणवली शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन बीटस्तरावर आठ विद्यार्थी पात्र झाले. तालुकास्तरासाठी चार विद्यार्थी पात्र झाले यामध्ये तालुकास्तरावर नेनवलीची इयत्ता चौथीची जान्हवी चव्हाण गणित व इंग्रजी स्पर्धेत प्रथम क्रमांक, आर्या मगर इयत्ता पाचवीमध्ये मराठी प्रथम क्रमांक, इयत्ता सातवीमध्ये आदर्श चव्हाण भाषेमध्ये द्वितीय क्रमांक, आणि आदेश जाधव याने इंग्रजी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून शाळेत एकूण पाच बक्षिसे पटकावली.

Exit mobile version