प्रदर्शनात पारनेरकर महाविद्यालयाचे यश

। आपटा । वार्ताहर ।
विद्यार्थ्यांनी मिळालेल्या मार्गदर्शनानुसर टाकावू वस्तूंपासून मूल्यवर्धित टिकाऊ वस्तू तयार केल्या होत्या. त्या वस्तूंचे अंतिम प्रदर्शन पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे आयोजित केले होते. त्यात रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा, रोटरी क्लब ऑफ बारामती, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट आणि रोटरी क्लब ऑफ पुणे युवा या 4 क्लबनी निवडलेल्या 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाने निवडलेल्या डॉ. पारनेरकर महाराज कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी यशस्वी ठरले.

यामध्ये वैष्णवी महेश नावडे द्वितीय क्रमांक 1000/-रुपये रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र, प्रफुल विष्णु मेढेकर परिक्षकांचे विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक 1000/- रुपये रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र, सानिया देविदास पाटील हिला प्लास्टिकमुळे होणार्‍या प्रदूषणाबाबत तिची कविता सादर करण्याची संधी मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील व्याख्याते डॉ. अनिल रामराव पाटील यांनी मार्गदर्शन लाभले. इतर 7 विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र व मराठी विज्ञान परिषद प्रकाशित पुस्तिका देण्यात आली. अमित शहा, रो. सचिन थोरात आणि रो. बाळकृष्ण होनावळे हे विद्यार्थ्यांबरोबर गेले होते. त्यांचाही प्रोजेक्ट सादरीकरणाच्या आणि पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी सक्रीय सहभाग होता.

Exit mobile version