राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सेंट झेवियर्स स्कूलचे यश

। महाड । वार्ताहर ।
बारामती येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात महाडमधील सेंट झेवियर्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावित यश संपादन केले. या विज्ञान प्रदर्शनात राज्यभरातून 260 बालवैज्ञानिकांनी सहभाग घेत आपल्या प्रकल्पाचे साजरीकरण केले. हे प्रदर्शन शारदानगर, ता. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात उभारलेल्या सायन्स अँन्ड इनोवेशन क्टिविटी सेंटरमध्ये नुकतेच संपन्न झाले.
22 जुलै 2021 मध्ये महाड शहरात आलेल्या महापुरात झालेले प्रचंड नुकसान व त्यापासून मानवाला मुक्ती मिळावी, या उद्देशाने सेंट झेवियर्स स्कूलच्या इयत्ता 8 वीमध्ये शिकणारी आर्या प्रदीप पवार या विद्यार्थिनीचा फ्लड सेक्युरिटी हा प्रकल्प प्रदर्शनात सादर केला. तर, इयत्ता 10 वीमध्ये शिकणारी अस्मिता चौगुले या विद्यार्थिनीचा वेस्ट मॅनेजमेंट हा प्रकल्प इयत्ता 9 वी ते 12 वी या गटात सादर केला. दोन्ही प्रकल्पांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या यशाबद्दल सेंट झेवियर्स स्कूल चेअरमन जॉन्सन डिसोझा व प्रिन्सिपल इजाबेला डिसोझा यांनी अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सेंट झेवियर्स स्कूलमधून इयत्ता 5 ते 8 गटात आर्या पवार, दीक्षा शेठ, आर्य कोल्हे व इयत्ता 9 ते 12 गटातून अस्मिता चौगुले, शंतनु पवार, आदित्य सलागरे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांना या प्रकल्प मांडणीकरिता विकास सिंग व सीमा हेलेकर या विज्ञान शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Exit mobile version