कुस्ती स्पर्धेत तळा कनिष्ठ महाविद्यालयाचे यश

| तळे । वार्ताहर ।

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रायगड आयोजित 24 व 25 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा खोपोली येथे पार पडल्या. या स्पर्धेत कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश प्राप्त केलेले आहे आणि कुस्ती स्पर्धेत यशाची परंपरा कायम राखली आहे.

19 वर्षाखालील मुलगे फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात सुजल रसाळ 74 किलो वजनी गट प्रथम क्रमांक, दिपेश तळकर 86 किलो वजनी गट प्रथम पटकावला तर फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात द्वितीय क्रमांकाने विजयी झालेले विद्यार्थी जयेंद्र राणे 61 किलो वजनी गट, साहिल करंजे 65 किलो वजनी गट, वेध शिंदे 92 किलो वजने गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला .

ग्रीको रोमन या कुस्ती प्रकारात संजय लोखंडे 63 किलो वजनी गट प्रथम क्रमांक, किशोर नागावकर 72 किलो वजनी गट प्रथम क्रमांक, विनायक रसाळ 87 किलो वजनी गट प्रथम क्रमांक, कलंक खाचे 97 किलो वजनी गट प्रथम क्रमांक, तेजस गवाणे 55 किलो वजने गट दुतीय क्रमांक प्राप्त केलेले आहेत.तसेच मुलींनीही 19 वर्षे वयोगट फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात समिधा माने 55 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, गौरी पेलनेकर 53 किलो वजने गटात द्वितीय क्रमांक, सायली शिंगाडे पन्नास किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवूण यश प्राप्त केलेले आहे.

विजयी झालेल्या सर्व खेळाडूंचे तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, पुरुषोत्तम मुळे, मंगेश देशमुख, महेंद्र कजबजे, दिलीप ढाकणे, सर्व कार्यकारणी सदस्य, विश्‍वस्त यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version