व्हॅली स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ येथे झालेल्या जीत कूणे डो राज्यस्तरीय स्पर्धेत वंजारपाड्यातील माथेरान व्हॅली स्कूलच्या खेळाडूंनी मोठे यश संपादन केले आहे. या शाळेच्या खेळाडूंनी विविध गटात 17 पदके पटकावली आहेत.

राज्यस्तरीय जीत कुणे स्पर्धेत नेरळजवळील माथेरान व्हॅली स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात अन्वी बाईत, खुशबू दिवेदी, वेदा गवळी, कार्तिक मेत्रे, निसर्गा गवळी, दिशांत भोईर या खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच, यश इंदलकर, श्‍वेता खोखले, आरोही पाटील, दिशा शेळके, वेदिका पेरणे, वैदेही जाधव, आरोही महावरकर यांनी रौप्य, तर योगेश बामने, सार्थक हर्यान, प्रांजल जोशी, चारुळ शिंदे, प्रणित मुणे या खेळाडूंनी कांस्यपदक पटकावले आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉ. धर्मेंद्र राठोड यांच्या हस्ते करणेत आले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्यावतीने अध्यक्ष गोपा कुमार नाय्यर, मुख्याध्यापिका मृदुला पटेल यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version