वसंतराव नाईक महाविद्यालयाचे यश

| आगरदांडा | प्रतिनिधी |

कोलाड येथील द.ग. तटकरे महाविद्यालयात 57 युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध महाविद्यालयांतून 20 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयातील अक्सा हुसेनी हिने वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे, महाविद्यालय विकास समिती सदस्य अ‍ॅड. इस्माईल घोले, वासंती उमरोटकर, माजी प्राचार्य डॉ. विश्‍वास चव्हाण, डॉ. नारायण बागुल, डॉ. सीमा नाहीद, प्रा. चिंतन पोतदार, रज्जब मुस्कान व प्राध्यापक, पालक वर्ग यांनी अक्सा हुसेनी हिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले.

Exit mobile version