शिहू बेणसे विभागाला भूमिगत वीजपुरवठा
| पाली | प्रतिनिधी |
शिहू बेणसे विभागाला भूमिगत वाहिनीतून वीजपुरवठा केला जाणार आहे. यासाठी माज़ीआ.धैर्यशील पाटील यांनी प्रयत्न केले आहेत. नुकतीच यासंदर्भात महावितरण अधिकार्यांसमवेत बैठकही आयोजित करण्यात आली होती.
या विभागाला वीजसमस्येने ग्रासले आहे. त्यातून होणार्या भयानक त्रासातूंन कधी सुटका होणार? असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे. आता मात्र या विभागाला भूमिगत वीज वाहिनीतून अलिबाग- कुसुंबळे फिडर तसेच पांडापूर पेण फिडरवरून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
या विभागातील विजसमस्यां लवकरच मार्गी लावण्याचे व यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन वीज मंडळाचे कोकण विभागीय अभियंता यांनी दिले आहे.
वीज समस्यांच्या प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली होती. सदर बैठक माजी आ.धैर्यशील पाटील यांच्या सहकार्याने शिहू बेणसे विभागाला नियमित व सुरळीत वीजपुरवठा व्हावा याकरिता घेण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा वनसंरक्षक अधिकारी आशिष ठाकरे, पेण वीज मंडळाचे उपअभियंता सपकाळे, प्रसाद भोईर आदी उपस्थित होते.