| रसायनी । वार्ताहर ।
लहरी हवामानावर मात करण्यासाठी शेतकर्यांकडून वेगवेगळी, पिके, उत्पादने घेतली तर त्यांचा अर्थीकस्तर उंचावेल. याचाच एक भाग म्हणून गुळसुंदे येथे मीनेश गाडगीळ यांनी 50 स्टॉबेरीची झाडे प्रयोग म्हणुन लावली होती. व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता केवळ प्रयोग म्हणुन आपल्या हवामानात, मातीत हे उत्पादन होइल का हे पाहण्यासाठीचा हा एक प्रयोग होता आणि जर यात यश आले तर इतर शेतकरीही असे नाविन्यपूण र्उत्पादन घेण्यास प्रवृत्त होतील हा दृष्टिकोन, आणि त्यात त्याना यश आले आहे. प्रत्येक झाड हे चांगले वाढले व फुले येउन साधारण दीडमहिन्यात फळ परिपक्व झाले आहे.
तांत्रिक व व्यावसायिक दृष्टिकोन ठेवुन योग्य प्रकारे खतमात्रा, फवारण्या व ड्रीपइरिगेशन, मल्चिंग यासारख्या अधुनीक तंत्रज्ञानाची जोड घेतल्यास उत्तम उत्पादन मीळेल व शेतकर्याना एकवेगळे नाविन्यपूर्ण व फायदेशीर असे उत्पादन घेता येइल व आपल्या परिसरातील ग्राहकानाही खात्रीशीर उत्पादन मीळेल आसा विश्वास मीनेश गाडगीळ यांनी व्यक्त केला.