जरांगेच्या सभेची खोपोलीत जय्यत तयारी

| खोपोली | प्रतिनिधी |

सोमवारी खोपोलीतील लौजी चिंचवली डिपी मैदानावर जरांगेंची सभा होणार आहे. सभेची तयारी अंतिम टप्यात आली आहे. सुमारे दोन लाखाहून अधिक मराठा समाजातील नागरिक उपस्थित राहतील अशी माहिती सकल मराठा राज्य समन्वयक डॉ.सुनिल पाटील यांनी दिली. सभा दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. 25 एकरांच्या भव्य मैदानावर सभा पार पडणार आहे.

लौजी ग्रामस्थांनी एक लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि नाष्टयांची व्यवस्था केली आहे. वाहने पार्किंगसाठी हाळ येथील मैदान तसेच ठाण्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी माणकिवली परिसर, पुण्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी नगरपालिका कार्यालयासमोरील मैदान अशी व्यवस्था केली आहे. नगरपालिकेने सभेच्या मैदानकडील जाणारे रस्ते चकाचक करीत विजेची व्यवस्था केली आहे. अग्निशमन दल, पालिका रूग्णालयातील डॉक्टरांची टिम सज्ज ठेवली आहे. फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध केली असल्याची माहिती मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी दिली.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील 350 पोलिस, 55 वाहतुक पोलिस, 40 पोलिस अधिकारी अशी पोलिसांची टिम असणार असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे.

Exit mobile version